रोहित दादांनी आज मा.अजित दादांच्या विमान अपघाताबद्दल घेतलेली प्रेस कॉन्फरन्स भल्या भल्यांची झोप उडवणारी आहे.
रोहित दादा विरोधी पक्षातील एक आमदार आहेत तरी ते इतक्या खोलवर जाऊन या अपघाताबद्दल,विमानाबद्दल त्या विमान कंपनीबद्दल,पायलट बद्दल,विमान कंपनीच्या whatsapp chat बद्दल इतकी सर्व माहिती गोळा करू शकतात तर जे लोक आज सत्तेत बसलेत ते ही सर्व माहिती का मिळवू शकत नाहीत ?
हा अत्यंत साधा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या अजित दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.
सरकारकडे इतक्या वेगवेगळ्या तपास संस्था आहेत तर हा तपास वेगाने का होत नाही आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांना तपासच करायचा नाही आहे हा प्रश्न देखील सामान्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.
रोहित दादांनी आज पत्रकार परिषदेत जे प्रश्न उपस्थित केले जे मुद्दे उपस्थित केले ते सर्व पुराव्यासह आणि सामान्य लोकांना समजेल अशा अतिशय सोप्प्या पद्धतीने त्यांनी ते मांडले.
जवळपास पावणेदोन तासांची ही पत्रकार परिषद लाखो लोकांनी पाहिली ती पाहून आता अनेक पत्रकार,सामान्य नागरिक दादांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सोशल मीडियावर पोस्ट,व्हिडीओ च्या माध्यमातुन चर्चा करताना दिसत आहेत.
दादांच्या पक्षात असणारे ज्यांना दादांनी भरभरून दिल ती पहिल्या फळीतील नेतेमंडळी या अपघाताबद्दल चकार शब्द काढत नसताना गप्प बसलेली असताना आज रोहित दादांनी धाडसाने आणि अभ्यासपूर्ण मांडलेले मुद्दे आणि अपघाताबद्दल उपस्थित केलेलं प्रश्न पाहून आज मा.अजित दादा सुद्धा जिथे असतील तिथून रोहित दादांना वा रे माझ्या पट्ठ्या म्हणत असतील हे नक्की.
रोहित दादा सगळे पुरावे गोळा करू शकतात, मग सरकार का नाही? विमान अपघात तपासावर घणाघाती सवाल”
Reviewed by Files
on
फेब्रुवारी १०, २०२६
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: