राम मंदिरावर दरोडा टाकला'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर स्फोटक हल्लाबोल!

राम मंदिर निधीप्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार; ५ जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा आंदोलन'ची घोषणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर निधी आणि मंदिरांशी संबंधित मुद्द्यांवर भाजपवर जोरदार टीका करत आंदोलनाची घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, 'अब हिंदू मार नहीं खायेगा.' आज मी म्हणतो, 'अब हिंदू माफ नहीं करेगा.' जे जे मंदिर लुटत आहेत, त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही."

येत्या ५ जुलै रोजी दादर येथील मारुती मंदिरात 'रामरक्षा आंदोलन' करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनात पक्षभेद बाजूला ठेवून सर्व रामभक्त आणि हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

"आम्ही जाब विचारण्यासाठी मंदिरात रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणणार आहोत," असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राम मंदिर उभारणीसाठी ज्यांनी संघर्ष केला, रक्त सांडले आणि तुरुंगवास भोगला, त्यांच्या त्यागाचा अपमान होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी राम मंदिर निधीच्या मुद्द्यावर सखोल चौकशीची मागणी केली.

उद्धव ठाकरेंच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Uploaded Image

राम मंदिरावर दरोडा टाकला'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर स्फोटक हल्लाबोल! राम मंदिरावर दरोडा टाकला'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर स्फोटक हल्लाबोल! Reviewed by Files on जुलै ०३, २०२६ Rating: 5

Blogger द्वारे प्रायोजित.