जिष्णू देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्माजी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आणि जनहितकारी कार्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.! 

श्री. जिष्णू देव वर्मा हे एक अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. त्रिपुराचे उपमुख्यमंत्री असताना लोककल्याणासाठी त्यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहे. तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी आपल्या कार्यकाळात ठसा उमटवला आहे. संविधानातील मूल्यांचे रक्षण आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपला कार्यकाळ यशस्वी ठरेल, असा आम्हास विश्वास आहे.



जिष्णू देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ जिष्णू देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ Reviewed by Files on मार्च ११, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.