पेपरफोड्या शिवराज मोटेगावकरचा ‘एज्युकेशन बिझनेस’ चर्चेत; विद्यार्थ्यांकडून लाखोंची वसुली केल्याचा आरोप

लातूर : पेपरफोड प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या कोचिंग व्यवसायाबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. मोटेगावकर हा क्लासेसच्या माध्यमातून मोठी कमाई करत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटेगावकरच्या क्लासमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक सुमारे ८० हजार रुपये फी भरावी लागत होती. याशिवाय राहण्याची व्यवस्था आणि खानावळीचा खर्च वेगळा आकारला जात होता. त्यामुळे एका विद्यार्थ्यामागे साधारण १ लाख २० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, शिकवणी वर्गासोबतच वसतिगृह आणि खानावळ व्यवसायातही मोटेगावकरने मोठे जाळे उभे केले होते. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची चर्चा आता लातूरमध्ये रंगू लागली आहे.
दरम्यान, पेपरफोड प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी काही पालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
Uploaded Image

पेपरफोड्या शिवराज मोटेगावकरचा ‘एज्युकेशन बिझनेस’ चर्चेत; विद्यार्थ्यांकडून लाखोंची वसुली केल्याचा आरोप पेपरफोड्या शिवराज मोटेगावकरचा ‘एज्युकेशन बिझनेस’ चर्चेत; विद्यार्थ्यांकडून लाखोंची वसुली केल्याचा आरोप Reviewed by Files on मे २१, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.