लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई; चालत्या कारमध्ये सट्टा खेळवणारे चौघे अटकेत

लातूर : जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले असून, आयपीएल क्रिकेट सट्टाप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने १३ एप्रिल रोजी आंबेजोगाई रोड परिसरात छापा टाकला. यावेळी एका चारचाकी वाहनामध्ये बसून आयपीएल सामन्यांवर सट्टा चालविणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले.Uploaded Image

लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई; चालत्या कारमध्ये सट्टा खेळवणारे चौघे अटकेत लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई; चालत्या कारमध्ये सट्टा खेळवणारे चौघे अटकेत Reviewed by Files on एप्रिल १७, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.