MAHARASHTRA

आमदार महेश सावंत जी ह्यांच्या प्रयत्नांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझे काका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे ह्यांच्यासह श्रीफळ वाढवून केला. 

कित्येक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले, अनेक क्रिकेटपटू ज्या मैदानाने घडवले, राजकीय नेत्यांच्या भाषणांनी गाजलेले, तसेच शिवसेनेचे 'शिवतीर्थ' म्हणून ओळख असलेल्या ह्या मैदानाचे सुशोभीकरण नीटनेटके व्हावे, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू!

ह्यावेळी आमदार महेश सावंत जी, मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर जी, नगरसेविका विशाखा राऊत जी, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, नगरसेवक यशवंत किल्लेदार जी, नगरसेविका श्रद्धा जाधव जी आणि नगरसेवक मिलिंद वैद्य जी उपस्थित होते.



MAHARASHTRA MAHARASHTRA Reviewed by Files on फेब्रुवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.