प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

औसा तालुक्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा निर्धार

लातूर जिल्हा परिषद व औसा पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिव येथे आयोजित प्रचार सभेत काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. या सभेस प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष यशपाल भिंगे, प्रदेश सचिव श्रीशैल्य उटगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद व पंचायत समितीतील भ्रष्टाचार, कमिशनखोरी संपवून शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आशिव व मातोळा परिसरातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकारी साखर कारखान्याचा विस्तार व उपपदार्थ प्रकल्प उभारून आर्थिक प्रगती साधली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
औसा तालुक्यात स्वच्छ प्रतिमेचे व कार्यक्षम उमेदवार दिले असून, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.
औसा तालुक्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा निर्धार औसा तालुक्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा निर्धार Reviewed by Files on फेब्रुवारी ०४, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.