गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे भावपूर्ण वातावरणात अंतिम दर्शन घेण्यात आले. राष्ट्रवादी परिवारासह मोठ्या संख्येने गोंदियावासी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर रजेगाव येथील वैनगंगा नदीच्या कोरणी घाटावर विधीवत पूजन करून दादांच्या अस्थींचे नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. डोळ्यांत अश्रू आणि मनात दादांविषयी अपार प्रेम घेऊन उपस्थितांनी 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणांत त्यांना अखेरचा निरोप दिला.
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान, साधी जीवनशैली आणि जनतेसाठी नेहमी तत्पर असलेला नेता म्हणून अजितदादांच्या आठवणींनी परिसर गहिवरून गेला. उपस्थित मान्यवरांनी दादांच्या विचारांना आणि कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
गोंदिया : अजितदादा पवार यांना भावपूर्ण अखेरचा निरोप
Reviewed by Files
on
फेब्रुवारी ०४, २०२६
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: